महसूल पंधरवाडा अंतर्गत 10 ऑगस्टला ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ विशेष उपक्रम

नांदेड:- 10 ऑगस्टला जिल्ह्यात महसूल विभाग सैनिकोहो तुमच्यासाठी विशेष उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनाने एक ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा महसूल व सामान्य जनता यांच्या मधला संपर्क वाढविण्यासाठी जनसंपर्क अभियानाचा ठरवला असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

सैनिक व तुमच्यासाठी हा उपक्रम 10 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले प्रमाणपत्रे मिळण्याबाबतच्या अर्जावर तत्काळ कारवाई करून निकाली काढावे असे आवाहन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडतकर यांनी केलेले आहे.

याशिवाय संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी, तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या िकारी कर्मचाी यांना घरााठी, शेतीसाठी जमीन वाटवाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधावा असे आवाहनही महेश वडदकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!