अनेक अधिकारी प्रतिक्षेत; अनेक पदे रिक्त
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरात 12 उपजिल्हाधिकारी आणि 15 तहसीलदार अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना दिल्या नाहीत ते प्रतिक्षेत आहेत. काही अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागी नवीन अधिकारी दिला नाही.
राज्यातील महसुल व वनविभागातील उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नांदेड येथील सचिन गिरी यांना मालाड-2 मुंबई येथे पाठविले आहे. वसमत येथील सचिन खलाळ यांना नांदेडला पाठविले आहे. नांदेड येथील विकास राजाराम माने यांना हिंगोली येथे पाठविले आहे. मनिषा दांडगे यांना परतूर येथून उपजिल्हाधिकारी रोह्यो जालना येथे पाठविले आहे. पद्माकर गायकवाड यांना जालना येथून परतूर येथे पाठविले आहे. विशेष भुसंपादन अधिकारी लसीका नांदेडचे अनुप पाटील यांना देगलूर येथे पाठविल ेआहे.वैजापुर जि.छत्रपती संभाजीनगर येथील अरुण जऱ्हाड जिल्हा पुनर्वसन अधिकारी जालना येथे पाठविले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रभोदय मुळे यांना उपजिल्हाधिकारी रोह्यो बीड येथे पाठविले आहे. कळमनुरी जि.हिंगोली येथील क्रांती डोम्बे यांना नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे नियुक्ती दिली आहे. हिंगोली येथील उमाकांत सिताराम पारधी यांना वैजापुर जि.छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती मिळाली आहे. समाधान घुटूकडे यांना हिंगोली येथून सामान्य विभाग बदलून उपविभागीय अधिकारी हिंगोली या पदावर नियुक्ती दिली आहे. शेती महामंडळ गंगापुर मळा जि.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंत माने यांना उपविभागीय अधिकारी हवेली जि.पुणे येथे पाठविले आहे. या बदल्यांमध्ये अधिकारी बदलला पण नवीन दिलेेला नाही अशा जागांवर नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश नव्याने जारी होती असे लिहिले आहे. ज्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्ती मिळाली नाही अर्थात प्रतिक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी महसुल आयुक्तांकडे हजर व्हावे असे लिहिले आहे.
महसुल व वन विभागातील कक्ष अधिकारी प्रशांत सपकळ यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केलेल्या आदेशानुसार तहसीलदार पदातील 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. हिंगोली येथील तहसीलदार उज्वला पांगरकर यांना अहमदपुर जि.लातूर येथे बदली दिली आहे.परांडा जि.धाराशिव येथील गणशाम आडसुळ यांना औसा जि.लातूर येथे बदली मिळाली आहे. आष्टी जि.बीड येथील तहसीलदार पी.एस.गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथे तहसीलदार निवडणुक या पदावर पाठविले आहे. अंबड जि.जालना येथील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना बीड येथे पाठविले आहे. देवणी जि.लातूर येथील गजानन शिंदे यांना हिमायतनगर जि.नांदेड येथे नियुक्ती दिली आहे. तुळजाभवानी मंदिरातील व्यवस्थापक सोमनाथ माळी यांना तहसीलदार देवणी जि.लातूर या पदावर पाठविले आहे. हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले आहे. अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर येथील विजय चव्हाण यांना अंबड जि.जालना येथे पाठविले आहे. गंगापुरचे तहसीलदार सतिश सोनी यांना धारुर जि.बीड येथे पाठविले आहे.नांदेड येथील सामान्य विभागाचे तहसीलदार रघुनाथ कोलगणे यांना लातूर तहसीलदार महसुल या पदावर पाठविले आहे. देगलूर येथील तहसीलदार राजाभाऊ कदम यांना जळकोट जि.लातूर येथे पाठविले आहे. बिलोली येथील तहसीलदार श्रीकांत निळे यांना तहसीलदार महसुल-2 बीड येेथे पाठविले आहे.वडवणी जि.बीड येथील दत्ता भारसकर यांना महाराष्ट्र महसुल न्यायाधीकरणात प्रबंधक पदावर पाठविले आहे. धाराशिव येथील महसुल तहसीलदार प्रविण पांडे यांना मराठवाडा महसुल शिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले आहे. प्रबोधिनी येथील श्रीकांत भुजबळ यांना हिंगोली येथे तहसीलदार पदावर पाठविले आहे. या आदेशातील भरत सुर्यवंशी, वैशाली पाटील, नरेंद्र कुलकर्णी, पल्लवी टेमकर, जीवककुमार कांबळे, सुरेखा स्वामी, आम्रपाली कासोदेकर आणि रोहिणी मोरे यांना नियुक्त्या दिल्या नाहीत हे सर्व अधिकारी प्रतिक्षेत आहेत.