नांदेड(प्रतिनिधी)-तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो असे सांगून एका 60 वर्षीय महिलेकडून एका भामट्याने 53 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
फेनुनिसा बेगम मोहम्मद युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुरेशीया मस्जिद नांदेड समोर 31 जुलै रोजी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान त्यांना एक भामटा भेटला आणि तुम्हाला शासकीय योजनेचे पैसे मिळवून देतो, तेथील अधिकारी माझा मित्र आहे असे सांगून ऍटोमध्ये बसवून त्यांना कोर्ट परिसरात आणले आणि त्यांच्याकडील सोन्याची एक गलसर, सोन्याचे शेवनपिस आणि एक ग्रॅमची बाली असा 53 हजार रुपयांचा ऐवज दिशाभुल करून घेवून गेला आहे. इतवारा पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(1)(2) प्रमाणे गुन्हा क्रमंाक 294/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भिसाडे हे करणार आहेत.