नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेल चालकाने देगलूर येथील पोलीस निरिक्षकांसोबत झटापट केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगलूरचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ किशनराव झुंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ते शहरातील आस्थापना बंद करत असतांना मंजु हॉटेलसमोर आले. त्यांनी एवढावेळ का आस्थापना सुरू ठेवली अशी विचारणा केली असता तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही असे म्हणून हुज्जत घालून झटापट केली आणि शासकीय कामात अडथळा केला. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 132 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33(आर)(डब्ल्यू) आणि 131 प्रमाणे गुन्हा क्रमांक 362/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्यात हॉटेल चालक संभाजी वसंतराव नाईकवाडे (35) रा.शहाजीनगर देगलूर यांचे नाव आरोपी सदरात आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक फड हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,625 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्याचा काका आता महाराष्ट्राचा काका झाला सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो म्हणून महिलेजवळील 53 हजारांचा ऐवज लंपास