नांदेड(प्रतिनिधी)-आपण पोलीस असल्याची बतावणी करून एका ठकसेनाने 72 वर्षीय शेतकऱ्याची फसवणुक करून त्याच्याकडील 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रंगनाथ परसराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलैच्या सकाळी 9 वाजेच्यासुमारास मौजे सायाळ शिवारातील पेट्रोलपंपाच्या शेडमध्ये ते थांबले असतांना त्यांच्याकडे एक अनोळखी व्यक्ती आला. नांदेडमध्ये लुटमार होत आहे. तुमच्या जवळची अंगठी व लॉकेट काढून कागदाची पुडी बांधून देतो ती डिक्कीत ठेवा असे सांगून हात चालाखी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गोप, कृष्ण असलेले पान, अंगठी असा 60 हजार रुपयांचा ऐवज नेला आहे. लिंबगाव पोलीसांनी हा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 319(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 101/2024 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिक्षिक सय्यद हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 919 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो म्हणून महिलेजवळील 53 हजारांचा ऐवज लंपास लोहामध्ये बनावट रासायनिक खते विकणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल