सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-9 हजारांची लाच घेणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाला आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी तीन दिवस अर्थात 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.25 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे जळगाव येथून आलेले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक अमोल सदाशिव वालझाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण जवाहर राठोड (34) यास 9 हजाराची लाच घेतांना पकडले. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हाा क्रमांक 652/2024 दाखल झाला. यानंतर या गुन्ह्याचा तपास नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला. सध्या तो तपास पोलीस निरिक्षक संदीप थडवे हे करीत आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोडला 26 जुलैच्या रात्री 3 वाजेच्या सुमारास अटक झाली.
पोलीस निरिक्षक संदीप थडवे, पोलीस अंमलदार यशवंत दाबनवाड, शेख रसुल, गजेंद्र मांजरमकर, सचिन गायकवाड आदींनी भुषण राठोडला न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी न्यायालयास सांगितले की, या प्रकरणात कोणी वरिष्ठ अधिकारी गुंतलेले आहेत काय याचा तपास करणे आहे. भुषण राठोडच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील घरांची झडती झाली आहे. त्याचा अहवाल प्राप्त करायचा आहे. ज्या 18 लोकांना वाहन चालकाच्या चाचणीत नपास करण्यात आले. त्यांचे जबाब घेणे आहे. हा घटनाक्रम पोलीस कोठडी देण्यासारखा नाही असा युक्तीवाद भुषण राठोडचे वकील ऍड. मिलिंद एकताटे यांनी केला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी भुषण राठोडला तीन दिवस अर्थात 29 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…..

सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अडकला 9 हजाराच्या लाच जाळ्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!