नांदेड(प्रतिनिधी)-आज गुरूवार, आषाढ शुध्द पंचमीच्या शुभमुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कारभार सांभाळला आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या नियुक्तीची चर्चा झाली. माजी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी केंद्रीय न्यायाधीकरण (कॅट)कडे धाव घेतली आणि शहाजी उमाप यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळवली. या प्रकरणात आपले म्हणणे सादर करतांना राज्य शासनाच्या गृहविभागाने कॅटला विनंती केली की, आपल्या एका स्थगितीमुळे प्रशासनाच्या पुर्ण प्रक्रियेवर बाधा येईल तरी आमच्याकडे रिकाम्या असलेल्या जागांमधील डॉ.शशिकांत महावरकर यांच्या पसंदीची जागा त्यांना देण्यात येईल. यावर डॉ.शशिकांत महावरकर यांनी सहपोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे या पदाला निवडले. परवा दि.23 जुलै रोजी शासनाने डॉ.शशिकांत महावरकर यांची बदली गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथून बदलून सहपोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे येथे केली.
या आदेशानंतर आज गुरूवारी आषाढ शुध्द पंचमीच्या शुभमुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांचे आगमन झाले आणि सकाळच्या सत्रातच त्यांनी डॉ.शशिकांत महावरकर यांच्याकडून नांदेड पोलीस परिक्षेत्राचा प्रभार आपल्याकडे घेतला आहे.