नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. 23 जुलै हा दिवस भारतीय स्वातंत्र्यातील महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विशेष शाखेचे जगन्नाथ पवार, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर्वांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि मारोती कांबळे यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 835 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.40 मि.मी. पाऊस जवाहरनगर येथे घर फोडले; विशालनगरमध्ये मंदिराची दोनपेटी फोडली; ट्रकचे दोन टायर चोरले