सकल मराठा समाजाने जवळाबाजार जि.हिंगोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली

नांदेड(प्रतिनिधी)-असोला धोबळे ता.औंढा जि.हिंगोली येथे एका सेवाकावर झालेल्याा प्राणघातक हल्यानंतर हिंगोली पोलीस अधिक्षकांनी निवेदनकर्त्यांना चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आज एका शिष्टमंडळा विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांची भेट घेवून निवेदन दिले.
असोला गावात सेवक पदावर कार्यरत असलेले मारोती पावडे यांच्यावर 18 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. हा हल्ला शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बालाजी नागरे यांनी केला. या हल्याविरुध्द सकल मराठा समाजाने हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांची भेट घेतली. पण त्या ठिकाणी सुध्दा जी. श्रीधर निवेदकांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे दिसत होते. पोलीस अधिक्षक कार्यालय हिंगोली येथील पोलीस अधिक्षक कक्षात झालेल्या गरमा गरम चर्चे सुध्दा व्हायरल झाला होता. पोलीस अधिक्षकांनी सकल मराठा समाजाच्या निवेदकांना दिलेल्या प्रतिसादानंतर आज जवळपास 100 लोकांच्या एका शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांची भेट घेतली. ज्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गजनान बोराडे आणि बिट अंमलदार सांगळे यांना निलंबित करून चौकशीची मागणी केली. गोळीबार करणारा बालाजी नागरे आणि त्याचे साथीदार यांच्याविरुध्द मकोका अंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी केली. गोळीबाराने पिडीत असलेल्या मराठा समाज बांधवांवरच हिंगोली पोलीस प्रशासनाने दरोड्याच्या खोट्या कार्यवाह्या केल्या आहेत. जवळाबाजार परिसरातील सुरू असलेले अवैध रेती, गुटखा, मटका, जुगार अड्डे, दारु इत्यादी धंदे बंद करावे. आमच्या मागण्यांची पुर्तता तीन दिवसात केली नाही तर 25 जुलैपासून हिंगोली जिल्हाभर तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला पोलीस प्रशासन जबाबदार राहिल असे या निवेदनात लिहिले आहे.
या निवेदनावर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, कल्याण देशमुख, बालाजी वानखेडे, गोविंद सोळंके, बाळासाहेब मगर, गजानन आवचाट, लहु लोमरे, सुनिल काळे, विठ्ठल देसाई, बाळासाहेब नरवाडे, बाला पाटील गावंडे, विनायकराव भिसेे, सागर डांगे, कोंडबा अंभोरे, माणिकराव सावंत, आबासाहेब सवंडकर, गजानन शिंदे, अमोल देशमुख, निलेश देशमुख, सोपान पाटील, भाऊराव ठाकरे, गजानन ठोंबरे, सुरज ढोबळे बऱ्याच लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर या शिष्टमंडळासोबत होते असे सांगण्यात आले. विशेष पोलीस महानिरिक्षकांनी पोलीस अधिक्षकांची बदली माझ्या हातात नसते असे शिष्टमंडळाला सांगितले. सोबतच सहाय्यक पोलीस निरिक्षक गजनान बोराडे यांच्याबद्दल चौकशी करेल आणि तो अहवाल पाठवून देईल असे डॉ.शशिकांत महावरकर म्हणाले.

हट्टा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी बदलला

सकल मराठा समाजाने आज विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची भेट घेताच त्वरित प्रभावाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हट्टा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांना बदलून त्यांच्या जागी संग्राम जाधव यांना पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!