नांदेड – कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत सोमवार दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, खरेदीदार-विक्रेते, कृषी विद्यार्थी तसेच नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. या संमेलनामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित राज्य व जिल्ह्यातील खरेदीदारांना एकत्र आणून परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होऊन करार व विपणनाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. संमेलनात एमएसआरएलएम व एसयूएलएम अंतर्गत बीज भांडवल व गट लाभार्थी महिलांचाही सहभाग राहणार असून अन्न प्रक्रियेशी संबंधित प्रक्रिया केलेले पदार्थ, भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने तसेच सेंद्रिय प्रक्रिया केलेल्या पदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच बाजारपेठ उपलब्धता, पिकांचे मूल्यवर्धन, ई-मार्केटिंग यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बँकांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून आर्थिक सहाय्याबाबत माहिती दिली जाणार आहे. ओएनडीसी, जीईएम तसेच डी-मार्ट, रिलायन्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केट आदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबतही माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 544 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोठेपणा पदात नाही, मनात असतो! शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात साधेपणाने पोहोचले खा.राहुल गांधी स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन