नांदेड(प्रतिनिधी)-गुरूपौर्णिमेला हिंदु धर्मात सर्वसाधारण महत्व आहे. या दिवशी अनेक गुरूवर्य आप-आपल्या मठसंस्थानात या पौर्णिमेचे आयोजन केल जात. ही पौर्णिमा शुध्द आषाढी अशी म्हणूनही ओळखी जाते. दि.21 जुलै रोज रविवारी मुखेड येथील गणाचार्य मठसंस्थान येथे या पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुखेड येथील गणाचार्य मठ संस्थान येथे दि.21 जुलै रोजी गुरूपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8 ते 10 गुरुवर्यांची इष्ठलिंग पुजा, 10 ते 12 पादपुजा व तिर्थ प्रसाद आणि 1 ते 3 गुरुवर्यांचे दर्शन आणि महाप्रसाद असा धार्मिक विधी यावेळी पार पडणार आहे. हा कार्यक्रम गणाचार्य मठ येथे होणार असून यामध्ये या मठाचे मठाधीपती श्री ष.ब्र.108 डॉ.विरुपक्ष शिवाचार्य महाराज यांच अर्शिवचन भक्तांना होणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहनही गणाचार्य मठ संस्था मुखेड सर्व भक्त मंडळी यांनी केले आहे.