नांदेड(प्रतिनिधी)-ओळख नसतांना एका अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या शाहरुख घोडेवाल्याला मुख्य न्यायदंडाधिकारी ए.के.मांडवगडे यांनी 27 जुनपर्यंत अर्थात 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.19 जून रोजी दुपारी डंकीन परिसरात, लिंगायत स्मशानभुमी परिसरात 20-30 वर्ष वयाच्या अनोळखी माणसाचे प्रेत सापडले. त्याचा खूनच करण्यात आला होता. पण मरणाऱ्याचेही नाव माहित नव्हते आणि मारणाऱ्यांचेही माहित नव्हते. अशा परिस्थितीत सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी अनोळखी माणसाचे प्रेत सापडल्यापासून 24 तास पुर्ण होण्याअगोदर काही युवकांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने अर्थात शेख शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल रा.बाराइमाम मस्जिद जवळ खडकपुरा नांदेड यास ताब्यात घेतले. त्याने हा खूनाचा प्रकार केल्याची कबुली पोलीसांना दिली. या प्रकरणी पोलीसांनी बऱ्याच युवकांची तपासणी केल्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शेख शाहरुखला अटक ्यात आली.
आज वजिराबादचे पोलीस िरिक्षक परमेश्र्वर कदम, पोलीस अंमलदार शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी लामतुरे आदींनी पकडलेल्या शेख शाहरुख उर्फ घोडेवाल्याला न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर न्यायाधीश ए.के.मांडवगडे यांनी शेख शाहरुखला सहा दिवस अर्थात 27 जून 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….
डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले