नांदेड(प्रतिनिधी)-आज होणारी पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रात्री झालेल्या अति पावसामुळे रद्द करण्यात आली असून आजची चाचणी 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे. 19 जूनपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरू झाल्या आहेत. काल रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे पोलीस मुख्यालयातील कवायत मैदान पाण्याने भरले. दुसरे मैदान उपलब्ध नसल्यामुळे आज होणारी पोलीस भरतीतील मैदानी चाचणी रद्द करण्यात आली असून ही चाचणी 4 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. आज मैदानी चाचणी देणाऱ्या उमेदवारांनी प्रवेश पत्रात दिलेल्या सुचनेप्रमाणे चार जुलै रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहावे असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 796 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन ओळख नसतांना अनोळखी व्यक्तीचा खुन करणारा शाहरुख पोलीस कोठडीत