नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्यात दोन जणांनी खाजगी सावकारी व्यवसायीकांकडून व्याजाने पैसे घेतल्याप्रकरणी एका आरोपीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी शेख खलील गुलाम महेमुद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 मे रोजी सकाळी 11 वाजता चव्हाणगल्ली जुना लोहा येथे राहणारा अजय पंडीत चव्हाण हा व्यक्ती गेला आणि त्याने तुमच्या मुलाने 70 हजार रुपये व्याजाने घेतले आहेत. तुमचा लहान मुलगा कोठे आहे अशी विचारणा केली. तसेच बेरळी ता.लोहा येथे हा अजय चव्हाण नावाचा व्यक्ती रात्री 9.45 वाजता गेला आणि तेथील ढेंबरे यांना सांगितले की, तुमच्या मुलाने माझ्याकडून 1 लाख 20 हजार रुपये व्याजाने घेतले आहेत. तुमची मुले माझा फोन उचलत नाहीत. तुमच्या मुलांनी घेतलेले पैसे मला परत करा नाही तर तुम्हाला व तुमच्या मुलांना मारुन पैसे वसुल करेल अशी धमकी दिली.
लोहा पोलीसांनी या तक्ररीवरुन अजय पंडीत चव्हाण या खाजगी सावकाराविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 34 नुसार गुन्हा क्रमांक 162/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे करत आहेत.
लोह्यातील खाजगी सावकार अजय चव्हाणविरुध्द गुन्हा दाखल

Kharach sahukari karj mule ghenare aani natevaik trast aahet