नांदेड(प्रतिनिधी)-जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून त्याचा खून केल्याचा प्रकार मौजे थडी शेळगाव शिवारात 20 मे ते 23 मेच्या दरम्यान घडला आहे. जुमूना सैदना जोगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा अशोक सैदना जोगे (22) रा.सुलतानपुर ता.बिलोली यास शिवाजी कांबळे, पिंटू कांबळे, वैजनाथ पाटील, सिध्दार्थ लाखे आणि गंगाधर पोखर्णीकर हे सर्व रा.सुलतानपुर यांनी 20 मे रोजी सोबत नेले आणि शेळगाव थडी शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रात फेकून त्याचा खून केला. जुन्या भांडणाच्या कारणावरुन हा खूनाचा गुन्हा घडला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 364, 202, 34 नुसार गुन्हा क्रमांक 58 /2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के हे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,219 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांविरुध्द कार्यवाही चैतन्यनगर भागात मटका जुगाराचे मोठे दुकान