नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात मुख्य रस्त्यावर मटका जुगाराचे मोठे दुकान राजरोसपणे सुरू आहे. मटक्याचे दुकाने चालावित पण त्यालाही काही लपवून असावे. राज कॉर्नर ते डीआरएम कार्यालय जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे दुकान मोठ्या स्वरुपात थाटले आहे. गेल्या तीस वर्षापासून आम्ही पाहतो आहोत. कोणताही पोलीस अधिकारी माझ्या हद्दीत कोणाताही अवैध धंदा सुरू आहे असे कधीच कबुल करत नाही. त्यांनी करूही नये त्याची अनेक कारणे आहेत. ती आम्हाला लिहिता येणार नाहीत.पण आमच्या माहितगाराने त्या मटक्याच्या दुकानातील व्हिडीओ आणि फोटो पाठविल्या आहेत. यावरुन मटका हा जुगार राजरोसपणे सुरू आहे याला नाकारता येणार नाही. चैतन्यनगर हा भाग कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो याची माहिती आम्हाला नाही. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/05/Matka-Jugar.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,475 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 22 वर्षीय युवकाला गोदावरी नदी पात्रात फेकून खून अल्पवयीन बालकाविरुध्द झालेले मिडीया ट्रायल सुपारी घेवून ?