नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नांदेड येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत आहे. त्यामुळे देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसला २८ आणि २९ मे या दोन दिवसा करिता हज यात्रे निमित्त दोन स्लिपर कोच वाढवण्यात यावे तसेच हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी खादिम हुज्जज ट्रस्ट चे अखिल अहमद कंधारी , मोहम्मद नवीद इक्बाल, मीर जावीद अली , शेख मोईन, हसनैन शेख, इक्बाल सिद्दीकी, बशीर अहमद,हैदर अली उपस्थित होते.
More Related Articles
अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी रोजनाम्यात खाडाखोड केली
अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन गैरकायदेशीर रित्या निकाल देणाऱ्या अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे-ऍड.हर्षवर्धन देशमुख…
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास एसबीआय बॅंकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिली बस
नांदेड :- भारतीय स्टेट बँकेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी सीएसआर अंतर्गत एक 40 आसन क्षमतेची…
बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्याा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने सोमवारी दुपारी 1…
