नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नांदेड येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत आहे. त्यामुळे देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसला २८ आणि २९ मे या दोन दिवसा करिता हज यात्रे निमित्त दोन स्लिपर कोच वाढवण्यात यावे तसेच हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी खादिम हुज्जज ट्रस्ट चे अखिल अहमद कंधारी , मोहम्मद नवीद इक्बाल, मीर जावीद अली , शेख मोईन, हसनैन शेख, इक्बाल सिद्दीकी, बशीर अहमद,हैदर अली उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 992 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मिडीया ट्रायल जिंकले आणि विधीसंघर्ष बालकाचा जामीन रद्द नांदेड बिदर महामार्गावर भीषण अपघात पती-पत्नी व मुलगा जागीच ठार