मिडीया ट्रायल जिंकले आणि विधीसंघर्ष बालकाचा जामीन रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-विधी संघर्ष बालकाच्या हाताने झालेल्या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. त्याला बाल न्यायमंडळाने 15 तासात जामीन दिला. याबाबीचे अनेक वृत्तवाहिन्यांनी मिडीया ट्रायल केले. त्यानंतर काल बाल न्यायमंडळाने जामीन दिलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा जामीन रद्द करून त्याला बाल सुधारगृहात पाठवून दिले आहे. त्याचा वडील सध्या पोलीस कोठडीत आहे.
काही दिवसांपुर्वी पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अत्यंत महागाड्या गाडीला चालविणाऱ्या अल्पवयीन बालकाच्या हाताने अपघात घडला. या अपघातातील दुर्देव असे की, या अपघातात एक युवक आणि एक युवती असे दोन अभियंते मरण पावले. त्या अल्पवयीन बालकाने दारु पिली होती. याचेही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर पुणे पोलीसांनी लहान बालकांना मद्य देणाऱ्या बारवर कार्यवाही केली. अल्पवयीन बालकाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अल्पवयीन बालकाच्या वडीलांना अटक झाली. कारण त्यांनी आपल्या बालकाचे वय पुर्ण झाले नसतांना त्याला चार चाकी वाहन चालवायला दिले आणि त्या बालकाच्या चुकीमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला हा सुध्दा त्यांचा गुन्हाच आहे. त्यानुसार पोलीसांनी त्यांनाही अटक केली. त्यानुसार ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
काही मोठी नावे असलेल्या वृत्तवाहिन्यांनी याचे मिडीया ट्रायल केले. पण त्यांना बाल न्याय कायद्याचा अभ्यास नव्हता असे आमचे मत आहे. परंतू त्या मिडीया ट्रायलमुळे काल बाल न्यायमंडळाने त्या अल्पवयीन तथा विधीसंघर्षग्रस्त बालकाला दिलेला जामीन रद्द केला आणि त्याला सुधारगृहात पाठवून दिले आहे. आता यापुढे त्या बालकाने जाणून बुजून अपघात केला काय ज्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला याचा अभ्यास समिती करेल आणि त्या समितीच्या अहवालानुसार विधीसंघर्षग्रस्त बालकाने जाणून बुजूनच हे सगळे केले असेल तर त्यावर वयस्क व्यक्तीप्रमाणे खटला चालेल.
मिडीया ट्रायलमध्ये कोणी आमदार साहेब, पोलीस ठाण्यात आले होते, विधीसंघर्षग्रस्त बालकाचे माफीयांशी संबंध आहेत असे सुध्दा दाखविले गेले. पोलीसांच्या चुकीमुळेच हे सर्व घडले असे दाखवले गेले आणि शेवटी विधीसंघर्षग्रस्त बालकाचा दिलेला जामीन रद्द करून बाल न्यायमंडळाने त्याची रवानगी सुधारगृहात केली आहे.
आम्ही सुध्दा कधी असे मिडीया ट्रायल केलेले आहे पण आमच्यावर त्यासाठी गुन्हे दाखल झाले. तेंव्हा आमच्या सहकारी पत्रकारांनी तो तुमचा व्यक्तीगत विषय आहे असे म्हणून आपले हात वेगळे केले. पण काही पोलीसांना आमच्या मिडीया ट्रायलमुळे मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले आणि आमच्यावर गुन्हे दाखल केले. आजही आम्ही गुन्ह्यांना सामोरे जात आहोत. बहुदा वास्तव न्युज लाईव्ह मोठ्या वृत्तवाहिन्यांसोबत तुलनेत लहान आहे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!