अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली

 

Oplus_131072

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का अपेेक्षेप्रमाणे वाढला नाही.दुपारच्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी 65 अशी आहे.

आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. त्यामध्ये काही ठिकाणी मतदारांनी 7 वाजण्याच्या अगोदपासून मतदान केंद्र गाठले पण मतदान प्रत्यक्षात 7 वाजता सुरू झाले. जिल्हा माहिती कार्यालय दर तासाला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीची माहिती प्रसारीत करत होते. अनेक ठिकाणी सखी मतदार केंद्र काम करत होते. तेथे येणाऱ्या मतदारांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. अनेक मतदान केंद्रांवर अत्यंत वयस्कर व्यक्तींनी सुध्दा मतदान केले. अनेक ठिकाणी दिव्यांगांनी मतदान केले. अनेक ठिकाणी तृतीय पंथीयांनी सुध्दा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विवाह सोह्ळ्यापुर्वी नवरदेव व नवरीने मिळून मतदान केल्यानंतर आपल्या विवाहची प्रक्रिया पुर्ण केली. सायकल रिक्षा चालकाने सुध्दा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 90 ते 105 वयोगटातील काही मतदारांनी आपले हक्क बजावले. काही गर्भवती महिलांनी सुध्दा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बरेच मतदार बाहेर गावी राहतात त्यांनी नांदेडला येवून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एक ठिकाण वगळता मतदानात कोठे गडबड झाली असे दिसले नाही. अनेक लोकांनी आपले मतदान केल्यावर आपले मतदान केल्यानंतरचे फोटो फेसबुवर, इंस्टाग्रामवर मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. आपण सुध्दा लवकर मतदान करा असे आवाहन केले. पण मतदानाच्या टक्केवारीत त्याचाही काही प्रभाव पडल्याचे दिसले नाही. प्रशासनाने तर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आधारे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न केले. दुसऱ्या टप्यात महाराष्ट्रात 8 लोकसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. पण रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान घ्यावेच लागते त्यानुसार बऱ्याच मतदान केंद्रावर मतदान सुरूच होते.

Oplus_131072
Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!