नांदेड(प्रतिनिधी)-विकासनगर जुना कौठा येथे सुरू असलेले बोगस आणि निकृष्ट दर्जाचे कामकाजाबाबत चौकशी करून ते काम संबंधीत कंत्राटदाराकडून काढून घेण्याचे निवेदन उत्तम शंकरराव वरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तोेंडले यांना दिले आहे.
कौठा येथील विकासनगर या सोसायटीमध्ये रस्त्याचे कॉंक्रीटीकरण सुरू आहे. या कामाचे कंत्राटदार रोहन मोरे हे आहेत. त्यांचे हस्तक असलेले दहीकळंबेकर हे विकासनगरमध्ये येवून लोकांना धमक्या देत आहेत. मी असेच काम करणार तुम्हाला कोठे जायचे ते जा असे सांगत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. कॉंक्रटीच्या कामाला पाण्याने भिजवणे आवश्यक असते ते सुध्दा होत नाही. या भागात वटेमोड हायस्कुल आहे. या शाळेत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी त्रासदायक ठरत आहे. त्यांना यामुळे रोगाई होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे लोकांच्या नळजोडण्या तुटल्या आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरीकांना पाण्याची अडचण होत आहे. या बाबत दहीकळंबेकर यांना सांगितले तेंव्हा मी सुध्दा गुंड आहे. तुम्हाला बघून घेतो अशा धमक्या देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता दिघे आणि नरबदवार यांना अनेक वेळेस विनंती करून सुध्दा ते यावर काहीच कार्यवाही करत नाहीत. म्हणून आज आपल्याकडे तक्रार देत आहे.या कामाच्या कंत्राटदाराने मल्लनिसारण चेंबर, नळाचे पाणी तोडून लोकांना त्रास आणले आहे. खरे तर काम सुरू असतांना असे काही घडले तर ते दुरूस्त करून देण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची असते. तरीपण या कामाचे कंत्राटदार तसे करत नाहीत आणि उलट धमक्या देवून घाणेरडे आणि विकृष्ट काम करत आहेत. म्हणून या तक्रारदाराच्या कामाची चौकशी करून संबंधीत कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी उत्तम शंकरराव वरपडे यांनी केली आहे.