नांदेड – मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिघजी औद्योगिक संस्था, नांदेड यांच्यावतीने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीपास उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. मेकॅनिकल मोटर व्हेईकल, फिटर, टूल अँड डाय मेकर, पेंटर जनरल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल ट्रॅक्टर, वेल्डर, वेल्डर (जीएमएडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू), शीट मेटल वर्कर आयसीटी एस एम, टर्नर , मशिनिस्ट ग्राइंडर ,वायरमन, मशिनिस्ट, फाउंड्रीमॅन इ. व्यवसायाचे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 660 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद शहरात 32 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही;कार्यवाहीत 13 हजार 600 रुपये दंड वसूल सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : याचिकेत दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयाचा आठवड्याचा अवधी