नांदेड(प्रतिनिधी)-मागील दोन ते तीन वर्षापासून कॉंगे्रस पक्षाची जी अवस्था झाली ती मी पाहत आहे. आज या पक्षाची जी अवस्था आहे ती फार दुरावस्था आहे. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंगे्रसला राज्यात 17 जागांवर समाधान मानाव लागत तर राज्यातील पक्षाला 20 ते 21 जागा दिल्या जात आहेत. या पक्षाला भवितव्य नाही. भाजपात येण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज पडली नाही. मला ईडी, सीडी, बीडीचा काही फरक पडत नाही असे म्हणत अशोक चव्हाण यांनी कॉंगे्रस पक्षाला डिवचले.
लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा प्रसिध्द केला. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत खा.अशोक चव्हाण बोलत होते. या पत्रकार परिषदेला महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, महानगराध्य दिलीप कंदकुर्ते, प्रविण साले यांची यावेळी उपस्थिती होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील 140 कोटी भारतीयांचे महत्वांकाक्ष पुर्ण करण्याच्या ध्याने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र जाहीर केले आहे. यामध्ये अनेक विकासविमुख कार्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला. 4 जून 2024 रोजी निकाल लागल्यानंतर पुन्हा केंद्रात भाजपा सरकार येईल आणि आल्यानंतर याची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल. 100 दिवसात कार्याचा आढावाही देखी घेतला जाईल. सरकार स्थापन होताच या संकल्प पत्राची अंमलबजावणी होणार आहे. 2047 पर्यंत भारत विकासित राष्ट्र म्हणून प्रवास करणार आहे. या संकल्पपत्रात 4 लाख नागरीकांनी नमो ऍपच्या माध्यमातून तर 10 लाख नागरीकांनी व्हिडीओच्या माध्यमातून सुचना सुचवल्या आहेत. त्यांचा यात समावेश आहे. हा जाहीरनामा नसून लोकांनी तयार केलेला लोकांसाठीचा संकल्पपत्र असल्याचे मत खा.अशोक चव्हाण यांनी म्हटले. यात अनेक मुद्दे समाविष्ट केले आहेत. युवकांच्या रोजगारासंदर्भात, महिलांच्या विकासाबाबतीत, पंतप्रधान सन्मान निधी योजना याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासासंदर्भात अनेक घटकांचा समावेश या संकल्पपत्रात करण्यात आल्याचे मत खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.