नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्ट्या लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2024 रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे.
More Related Articles
अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या दोन युवकापैकी एकाला नांदेड येथील…
अनधिकृत जाहिरात होर्डीगवर महापालिकेची धडक कारवाई;वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागात महानगरपालिके तर्फे अनधिकृत जाहिरात होर्डीग्सवर धडक कार्यवाही…
नांदेडमध्ये सोमवारी कव्वाली महोत्सव
नांदेड,(जिमाका)-राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महासंस्कृती, महानाट्य महोत्सवापाठोपाठ नांदेडमध्ये सोमवारी 18 मार्च रोजी कव्वाली महोत्सव होत…