नांदेड(प्रतिनिधी)-लोहा न्यायालयाने लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर बद्दल स्वत:कडेच फौजदरी संक्षिप्त खटला क्रमांक 119/2024 नोंदवून घेतला आहे. यापुर्वी प्रसारीत केलेल्या बातमीमध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असे शब्द होते. पण त्या माहितीनंतर झालेली सुधारणा आम्ही वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत.
चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांना मारहाण झाल्यानंतर ते स्वत: न्यायालयात गेले आणि न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 190(अ) प्रमाणे दंडाधिकारी प्रथमवर्ग श्रेणी लोहा न्यायालय क्रमांक 1 कडे चंद्रकांत क्षीरसागर यांची तक्रार लिहुन घेण्यात आली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.वि.डाखोरे यांनी लोहाच्या न्यायालय प्रबंधकाला निर्देश दिले की, ही तक्रार संक्षिप्त फौजदारी खटला म्हणून नोंदवावी. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 294, 504, 506, आणि 323 ही जोडावीत. हा खटला लोहाचे पोलीस निरिक्षक चिंचोळकर यांच्याविरुध्द नोंदवावा.
या आदेशानुसार लोहा येथील न्यायालय प्रबंधकांनी या प्रकरणात संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक 119/2024 दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्याबद्दलचे दोषारोप न्यायालयात दाखल करतात आणि त्यानंतर न्यायालयात त्यावर त्या प्रकरणातील कलमानुसार खटला दाखल होतो. लोहा न्यायालयाने चंद्रकांत क्षीरसागर यांच्या प्रकरणात स्वत:च खटला दाखल करून घेतला आहे.
वाचकांच्या सोयीसाठी नव्याने प्राप्त झालेली सर्टिफाईड पीडीएफ संचिका या बातमीसोबत जोडत आहोत.
संबंधीत बातमी…