लाचखोर डॉक्टर पती-पत्नीच्या घरात सापडले 57 लाख 96 हजारांचे सोन्याचे दागिणे; 2 लाख 22 हजार रुपये रोख रक्कम

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथील रक्तपेढीकडून लाच स्विकारणाऱ्या महिला डॉक्टर आणि त्यांच्या पतीच्या घरात झालेल्या झाडाझडतीनंतर 92 तोळे सोने आणि 2 लाख 22 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे.
नांदेड येथील एका रक्तपेढीकडून प्रादेशिक रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.अश्र्विनी गोरे यांनी 1 लाख 10 रुपये लाचेची मागणी केली. जागतिक महिला दिनी, 8 मार्च रोजी त्यांचे पती-अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रितम राऊत यांनी नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळ 50 हजारांची लाच स्विकारली. नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही डॉक्टर पती-पत्नींना अटक केली. 14 मार्च पर्यंत ते पोलीस कोठडीत होते.सध्या त्यांचे वास्तव तुरुंगात आहे.
येथे डॉक्टरांना अटक झाल्यानंतर धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सिध्दराम म्हैत्रे, पोलीस निरिक्षक कदम, पोलीस अंमलदार शेवाळे, पाटील आणि आचार्य यांनी धाराशिव येथील मोठ्या इमारतीत असलेल्या डॉ.प्रितम राऊत आणि डॉ.अश्र्विनी गोरे यांच्या सदनिकेचे तपासणी केली तेंव्हा तेथे एकूण सहा खोल्या आहेत. ज्यामध्ये चार नियमित खोल्या आहेत आणि दोन स्टोअर रुम आहेत. त्यामध्ये तपासणी झाल्यानंतर पोलीसांना 92 तोळे सोन्याचे दागिणे आणि 2 लाख 22 हजार रुपये रोख रक्कम असे घबाड सापडले आहे. सोन्याच्या आजच्या दराप्रमाणे 92 तोळे सोन्याचा गुणाकार केला असता त्याचे उत्तर 57 लाख 96 हजार रुपये होत आहे.
संबंधीत बातमी….

 

डॉक्टर पती-पत्नी सध्या तुरूंगात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *