नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी देगाव येथे एका लग्न समारंभात नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या चार चाकी वाहनाच्या काचा अज्ञात लोकांनी फोडल्याचा प्रकार घडला.आ. कल्याणकरांनी कोणतीही कार्यवाही या संदर्भाने केली नाही. आज देगाव ता.अर्धापूर येथील कदम यांच्या मुलीचे लग्न पुयणी येथील पावडे यांच्या मुलासोबत झाले. या लग्न समारंभात मोठा जनसमुदाय होता. या लग्नसमारंभासाठी नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर हे सुध्दा गेले होते. गर्दी असल्याने त्यांची गाडी दुर उभी राहिली. त्यांचे सुरक्षा रक्षक आणि गाडीचे चालक सुध्दा लग्नात सहभागी झाले. दरम्यान एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काही लोकांनी आ. कल्याणकर यांचे चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बीसी 7771 या गाडीचे पाठीमागील काच दगडांनी फोडून टाकले. या संदर्भाने पोलीस विभागाकडून माहिती घेतली असता या संदर्भाने कोणतीच कार्यवाही कोणाविरुध्दही करायची नाही असे बालाजी कल्याणकर यांनी सांगितल्याची माहिती खात्रीलाय सुत्रांनी दिली आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240317-WA0008.mp4 Kanthak Suryatal Post Views: 2,160 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खा.चिखलीकरांना पुन्हा उमेदवारी ; खा.चव्हाणांची परीक्षा पुस्तकाचा गुत्तेदार आता पत्रकारांचा गुत्तेदार झाला