नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हे दि.18-19 या दोन दिवसाच्या दौऱ्यावर नांदेड-हिंगोली लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांशी जनसंवाद साधणार आहेत. या दरम्यान हिंगोली येथे त्यांचा 18 मार्च रोजी मुक्काम असणार आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे, युवा सेना प्रमुख महेश खेडकर, नांदेड शहर प्रमुख पप्पु जाधव, मुकूंद जवळगावकर, व्यंकोबा येडे, गौरव कोटगिरे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पावडे बोलतांना म्हणाले की, उध्दव ठाकरे हे दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असून ते दि.18 रोज सोमवारी सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानळावर आगमन होणार आहेत. येथून ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास हजेरी लावणार आहेत. त्यानंतर सेनगाव, कळमनुरी येथेही संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर हिंगोली येथे त्यांचा रात्री मुक्काम राहणार आहे.दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दि.19 रोजी उमरखेड येथे कार्यकर्त्यांशी वाद साधून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे दुपारी 1 वाजता कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा एकत्र संवाद मेळावा नांदेड अर्धापूर रोडवर असणाऱ्या पिंपळगाव महादेव येथे दुपारी 3 वाजता संवाद साधणार आहेत. यांच्यासोबत खा.संजय राऊत, खा.विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गद्दारांचे परतीचे दोर तेंव्हाच कापले
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. यामुळे आता इकडून तिकडे पक्षांतराच्या उड्ड्या सुरू होणार यात शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेले गद्दार 12 आमदार पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात नांदेड उत्तरचे गद्दार शिवसेना आमदार यांचे ही नाव आहे. पण खा.संजय राऊत यांनी गद्दारांच्या परतीचे दोर तेेंव्हाच कापण्यात आले. त्यामुळे त्यांना आता आमच्या संधी नाही. यामुळे आता गद्दारांना आमच्या पक्षात जागा नाही जनता त्यांना आत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस संरक्षण काढताच जनतेने त्यांना धडा शिकवला असा हल्ला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केला.