नांदेड: – नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुक्यामध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी सक्रियतेने हा उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, पण मतदानाची टक्केवारी त्या अनुषंगाने कमी होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त टक्केवारीने मतदान करणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध व्हावा, या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा स्विप कक्षाची स्थापना केली आहे. या स्वीप कक्षाच्या वतीने विविध तालुक्यात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी विविध स्पर्धा, जनजागृती करीत आहेत.
आजपर्यंत सोळा तालुक्यातील स्विप कक्षाने कोणकोणते कार्यक्रम घेतले, काय नियोजन केले याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा स्विप कक्ष प्रमुख डॉ. पंजाबराव खानसोळे व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पाचंगे यांनी जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. अत्यंत काटेकोरपणे सर्व तालुक्यातील नियोजन करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून विविध तालुक्यातील स्विप कक्षास भरीव मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस 16 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी असे एकूण 53 अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तर आभार राजेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मुदिराज, साईनाथ लबडे, आनंदी वैदय, साईनाथ चिद्रावार व संजय ढवळे यांनी परिश्रम घेतले.