डॉक्टर पती-पत्नी सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर पती पाच दिवस पोलीस कोठडीत डॉक्टर पत्नी चार दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती केल्यानंतर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या दोघांना न्यायालयीन कोठडी अर्थात सध्या तरी तुरूंगात पाठवून दिले आहे.
7 मार्च रोजी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे यांनी डॉक्टर्सलेनमधील अर्पण रक्तपेढीची तपासणी करून त्रुटी न काढण्यासाठी 1 लाख 10 जारांची मागणी केली. तेंव्हा अर्पण रक्तपेढीच्या लोकांनी 10 हजार रुपये दिले आणि उर्वरीत 1 लाख रुपये घेण्यासाठी 8 मार्च, जागतिक महिला दिनी आपला नवरा डॉ.प्रितम तुकाराम राऊत यांना पाठविले. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ.प्रितम राऊतला अटक केली. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने प्रितम राऊतला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. 9 मार्च रोजी सायंकाळी डॉ.अश्र्विनी गोरे यांना अटक झाली. त्यांना न्यायालयाने 10 मार्च रोजी 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.
दोघांची पोलीस कोठडी एकाच दिवशी आज संपली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार दिपीका शिंदे, राजेश राठोड, शेख कदीर, सचिन गायकवाड, प्रकाश मामुलवार, आदींनी दोघांना न्यायालयात हजर करून या दोघांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या दोघांना सध्या तरी तुरूंगात पाठवून दिले आहे.
संबंधीत बातमी…

लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *