नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषांना घरी बोलवून त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ व फोटो काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केली आहे. या संदर्भात अशा घटना कोणासोबत घडल्या असतील तर जनतेतील त्या लोकांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
काल पोलीस ठाणे भाग्यनगर येथे आलेल्या तक्रारीवरुन दोन महिला आणि तिन पुरूषांच्या अर्धवट नावासह गुन्हा क्रमांक 98/2024 दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांना आदेशित केल्यानंतर गुन्हा क्रमांक 98 मधील आरोपी पुणे येथे पळून जाणार आहेत अशी गुप्त आणि खात्रीलायक माहिती पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने मिळवली. आणि त्वरीत विशाल हरीश कोटीयन (33) रा.कलामंदिर शिवशक्तीनगर नांदेड, नितीन दिनेश गायकवाड (28) रा.साठे चौक नांदेड, सुनिल ग्यानोबा वाघमारे(34) रा.पौर्णिमानगर नांदेड, निता नितीन जोशी(27) रा.प्रकाशनगर नांदेड, राधिका रुपेश साखरे (25) गणेशनगर नांदेड यांना अटक केली. या पाच जणांची रवानगी पुढील तपासासाठी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे करण्यात आली आहे. ही टोळी महिलांच्या मदतीने पुरूषांना आपल्या घरी बोलावून त्यांना निर्वस्त्र करून त्याचे फोटो आणि व्हिडीओ तयार करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे काम करीत होती. नांदेड जिल्ह्यातज अशा प्रकारच्या घटना कोणा सोबत घडल्या असतील आणि त्यांनी आजपर्यंत तक्रार दिली नसेल तर त्या नागरीकांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी ही कार्यवाही करणारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार हेमलता भोयर, किरण बाबर, शेख महेजबीन, हनुमानसिंह ठाकूर, बालाजी तेलंग, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड, रणधिर राजबन्सी, धम्मानंद जाधव, गणेश धुमाळ, विलास कदम, बालाजी तेलंग यांचे कौतुक केले आहे.
वास्तव न्युज लाईव्हने या गुन्ह्याची बातमी सकाळीच प्रसिध्द केली होती.
संबंधीत बातमी…