नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मुखेड तालुक्यातील मुखेड ते लातूर महामार्गावर एका बिअर बारमध्ये मौजे सांगवी भादेव ता.मुखेड येथील ग्रामसेेवक कृष्णा तुकाराम रामदिनेवार (38) यांनी 24 हजारांची लाच मागणी करून तडजोड करत 24 हजार रुपये लाच स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कृष्णा तुकाराम दिनेवार विरुध्द मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हाा क्रमांक 67/2024 दाखल केला. काल ग्रामसेवकाला अटक झाली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जमीर नाईक यांच्याकडे आहे.
आज दुपारी पोलीस निरिक्षक जमीर नाईक आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेला ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यास जिल्हा न्यायालय मुखेड येथे हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जिल्हा न्यायधीश मुखेड यांनी रामदिनेवारला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…