नांदेड(प्रतिनिधी)-24 हजारांची लाच स्विकारणाऱ्याा ग्रामसेवकाला मुखेड जिल्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड ते लातूर महामार्गावर एका बिअर बारमध्ये मौजे सांगवी भादेव ता.मुखेड येथील ग्रामसेेवक कृष्णा तुकाराम रामदिनेवार (38) यांनी 24 हजारांची लाच मागणी करून तडजोड करत 24 हजार रुपये लाच स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कृष्णा तुकाराम दिनेवार विरुध्द मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हाा क्रमांक 67/2024 दाखल केला. काल ग्रामसेवकाला अटक झाली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जमीर नाईक यांच्याकडे आहे. आज दुपारी पोलीस निरिक्षक जमीर नाईक आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेला ग्रामसेवक कृष्णा रामदिनेवार यास जिल्हा न्यायालय मुखेड येथे हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जिल्हा न्यायधीश मुखेड यांनी रामदिनेवारला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. संबंधीत बातमी… बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड Kanthak Suryatal Post Views: 1,300 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सावधान ! दहावी व बारावी परीक्षेबद्दल अफवा पसरविल्यास कारवाई व्हीआयपी सुरक्षा प्रशिक्षणात पहिल्या पाच मधील तीन नांदेड जिल्ह्याचे पोलीस