लेख

अशोक चव्हाणांची आकाशला मदत ; आपण केलेल्या मेहनतीचे फळ कधी तरी मिळतेच असे सांगणारा प्रसंग

नांदेड(प्रतिनिधी)-आपले काम करत-करत जेंव्हा आपण चालत असतो त्यावेळी कोणी त्याची दखल घेईल, कोणी घेणार नाही अशीच परिस्थिती असते. कोणी चांगली दखल घेतली तर शाब्बासकी मिळते, कोणी कटाक्ष केला तर आपल्या मेहनतीचा विदुषक झाला असे वाटते. पण आपण ठरवलेले काम करत गेले तर कधीच तरी त्या कामाची पावती मिळतेच. असा एक प्रकार नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे […]

लेख

चित्तथरारक ट्रेकिंग सांदण दरी

निसर्गाच्या कुशीत दडलेले अद्भुत चमत्कार म्हणजेच सांधण व्हॅली अर्थात सांधण दरी. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ह्या व्हॅलीच दूसरा क्रमांक लागतो.एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कारच! सह्याद्रीच्या पर्वतरांगा नांदेड ट्रेकर्सना नेहमीच मोहवत असतात. पण ह्या वेळेस हे आश्चर्य आम्हा नांदेड ट्रेकर्सना […]

लेख

कर्दनकाळ पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर 

आपल्या जीवनाची सुरूवात होते तेंव्हा आपल्यासाठी जग अनभिज्ञ असते. आपल्या जीवनाचा आकार आई-वडील संस्कारातून सुरू करतात. दगड असलेले आपण शाळेत जातो तेंव्हा दगडाला कोरून त्याचे शिल्प तयार करतो तो शिक्षक. शिक्षकाने तयार केलेले हे शिल्प जीवनाच्या उंबरठ्यावर आपला पाय ठेवून सुरू करतो आपल्या जीवनाची दिक्षा शोधणे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शक सापडला तर ती दिशा योग्य ठरते […]

लेख

जल व्यवस्थापनातील निर्मळतेचा समृद्ध काठ : डॉ. शंकरराव चव्हाण

मराठवाड्याच्या वाट्याला केवळ इतिहासाचे विविध संदर्भ वाट्याला आले असे नाही तर भौगोलिक दृष्ट्याही हा प्रांत विविध आव्हानांचा साक्षीदार राहिलेला आहे. दुष्काळाच्या झळा मराठवाड्याने अधिक भोगल्या आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर अजिंठ्याच्या पर्वत रांगापासून कन्नड, वेरुळ, औरंगाबादच्या पर्वतरांगा, पुढे बीडकडे सरकल्यावर बालाघाटच्या डोंगररांगा, ऐतिहासिक कंधारपासून माहूर पर्यंत व पुढे किनवट मार्ग तेलंगणापर्यत, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या […]

लेख

‘वज्रमूठ’ हा कविता संग्रह सप्तरसांनी रंगवलेल्या कवितांनी भरला आहे

पुस्तक परिक्षण रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड नांदेड- प्रत्येक माणसाच्या मनात काही भावना या दबलेल्या असतात. या दबलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत माणुस त्या भावनांना जगासमोर आणत असतो. त्या भावना जगासमोर येतात तेव्हा त्या भावनांमध्ये लपलेल्या खऱ्या अर्थाला समजणे महत्वपूर्ण आहे. असाच एक प्रयत्न कसबे तडवळे येथे जन्म घेतलेल्या आणि सध्या सहायक पोलीस निरीक्षक […]

लेख

दंगा मुक्त महाराष्ट्राचे संकल्पक,सामाजिक एकतेचे प्रतीक राजर्षी शाहू महाराज..-शेख सुभान अली

१८९३ साली मुंबईत पहिली हिंदू – मुस्लिम दंगल झाली.मुंबई नंतर पुण्यात ही दंगल घडली.त्याच वर्षी १८९४ साली  पुण्यात सार्वजनिक सभेत राजर्षी   शाहू महाराज यांच्या सत्कार  करण्यात आला होता.या सत्कार समारंभात आपल्या भाषणात शाहू महाराजांनी पुण्यात घडलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीचे उल्लेख करत सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांना हिंदू मुस्लिम समाजात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून समाजात शांती स्थापन करण्याचे आवाहन […]