नांदेड(प्रतिनिधी)- दहीहंडीमध्ये वाद आणि त्यानंतर झालेल्या अपमानाचा बदला माफी मागण्यासाठी जावून एकाचा खून आणि दोघांना जखमी करून घेण्यात आला. हा प्रकार शहरातील राज कॉर्नरजवळ विमानतळकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 2.30 वाजेच्यासुमारास राज कॉर्नरकडून विमानतळकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री दहिहंडीमध्ये वाद झाला होता. त्या वादाचे समापन एक दुसऱ्याला भेटून माफी मागून करण्याचे ठरले होते. त्यानुसार अंकुश प्रकाश इंगोले(22) हा त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी असलेल्या वैभव दत्तात्रय दुधाटे, लक्ष्मण देशमुख, कृष्णा धोंडीबा मुळे यांच्यासोबत पुन्हा वाद सुरू झाला आणि या वादात अंकुश प्रकाश इंगोलेने आपल्याकडील चाकूने तिघांवर वार केले. नंतर वैभव दुधाटेला आणि इतर दोन जखमींना दवाखान्यात नेले असता त्यातील वैभव दुधाटेचा मृत्यू झाला असे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याप्रकरणी वृत्तलिहिपर्यंत पोलीस ठाणे भाग्यनगरमध्ये कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. पण कायदेशीर प्रक्रिया सुरू हे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हल्ला करणार अंकुश इंगोले हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. Kanthak Suryatal Post Views: 3,051 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बापाच्या खूनाचा मास्टरमाईंड मुलगाच 33 कोटी देवांचा घाणेरड्या शब्दात उल्लेख करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल