नांदेड(प्रतिनिधी)-1 सप्टेंबर रोजी सकाळी वाघी रोडवरील सैलाबनगर भागात आपल्याच घरात मरण पावलेल्या शेख युनूस शेख पाशा यांच्या खूनाचा मास्टरमाईंट त्यांचा मुलगाच निघाला. त्याने आपल्या एका नातलगासह आणि मित्रासह मिळून हा खून केला आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी सौ.मांडवगडे यांनी याप्रकरणातील तिन मारेकऱ्यांना चार दिवस कोठडीत पाठविले आहे.
दि.1 सप्टेंबर रोजी वाघी रोडवरील टोलेजंग इमारतीत त्या इमारतीचे मालक शेख युनूस शेख पाशा (45) यांचा मृतदेह सापडला. हा खून केल्याचाच प्रकार होता. त्यानुसार त्या प्रकरणी खुनाचा गुन्हा अज्ञात व्यक्तींविरुध्द दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे यांच्याकडे देण्यात आला. त्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रे स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे पोलीसांना या घटनेचा तपास आव्हानात्मक होता. पोलीसांनी हळूहळू आपल्या कौशल्याला वापरून हे शोधून काढले की, शेख युनूस शेख पाशा यांच्या मृत्यूसाठी त्यांच्या मुलाचा हातभार आहे. त्यानंतर झालेल्या तपासात पोलीसांनी मदीना हॉटेलचे मालक शेख युनूस शेख पाशा यांच्या खूना प्रकरणी ्यांचा मुलगा शेख यासेर आरफात शेख युनूस (20) रा.दुल्हेशाह रहेमाननगर वाघी रोड, त्याचा नातलग शेख आमजद शेख इसाख (24) आणि योगेश शिवाजी निकम (24) रा.सिकंदरनगर मनमाड या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना काल अटक झाली.
आज सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार मनोज राठोड, अंकुश पवार, नागरगोजे, साखरे यानी पकडलेल्या तिन जणांना न्यायालयात हजर करून या प्रकरणात आणखी कोणी गुंतलेले आहे काय, प्रत्यक्षात खून कसा झाला याचा शोध घेणे आहे तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा मुद्दा मांडल्यानंतर न्यायाधीश सौ.मांडवगडे यांनी बापाचा खून करणाऱ्या मुलासह तिन जणांना चार दिवस अर्थात 10 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…