नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील मोंढा कॉर्नर येथे असलेल्या एटीएम सेंटरमध्ये 72 वर्षीय व्यक्तीला गोडबोलून त्याचे 80 हजार रुपये लांबवल्याचा प्रकार घडला आहे. बळीराम रामन्ना रामदिनवार(72) रा.पेठ आमरापूर ता.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास ते देगलूर येथील एसबीआय बॅंकेच्या मोंढा कॉर्नर येथील एटीएम सेंटरमध्ये गेले होते. 72 वर्षीय व्यक्ती पाहुन एका भामट्याने तुमचे पैसे काढून देतो असे म्हणून एटीएम हातचालाखीने आदलाबदली करून बळीराम रामदिनवार यांच्या खात्यातील 80 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे. देगलूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 318(4) नुसार गुन्हा क्रमांक 410/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पत्रे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 751 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरली