नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी चार वाजता श्री. गुरुगोविंद सिंग जी नांदेड विमानतळावर आगमन झाले. नांदेड व हिंगोली जिल्हयांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर ते आले आहेत. नांदेड विमानतळावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री श्री.अजीत पवार नांदेडवरून वसमत रोड जिल्हा हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत.त्या ठिकाणच्या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्कामी असणार आहेत. त्यांच्यासोबत खा.सुनील तटकरे, रूपाली चाकणकर यांचेही आगमन झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,424 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निमगाव ता.अर्धापूर येथे पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले 72 वर्षीय व्यक्तीला 80 हजारांना गंडविले