नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.
More Related Articles
आनंदी विकास यांची आज आकाशवाणीवर मुलाखत
नांदेड- नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध…
60 हजार रुपये किंमतीचे गंठन महिलेच्या गळ्यातून तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-एका 40 वर्षीय महिलेच्या घरासमोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला…
विशेष पथकाने अवैध वाळूची हायवा गाडी पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी अवैधपणे वाळू भरून जाणाऱ्या हायवा गाडीला पकडले आहे. दोन जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेप्रमाणे…
