नांदेड(प्रतिनिधी)-सिख समुदायाचे तत्वज्ञान, ईतिहास आणि परंपरांच्या विविध पैलूंना चित्रांद्वारे जिवंत करणाऱ्या कलाकृतींचा रेणादायी संग्रह दि.15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान महाकला राष्ट्र गॅलरी येथे आयोजित करण्यात आला आहे. महाकला राष्ट्र गॅलरी पीव्हीआर सिनेमाजवळ नवीन कौठा येथे आहे. दररोज हे चित्र प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत राहणार आहे. जनतेने या सिख समुदयावर आधारीत चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक विजय रणविर यांनी केले आहे.
भारताच्या ईतिहासात सिख समुदायाची मोठी भागिदारी आहे. या ईतिहासाला, सांस्कृतीक परंपरांना आणि आध्यात्मिक वारसाला डोळ्यासमोर ठेवून महाकला राष्ट्र गॅलरी नांदेड यांनी सिख समुदायाच्या तत्वज्ञान, ईतिहास आणि परंपरांना अनुसरून तयार केली आहे. या प्रदर्शनात कुशल कलेचा संग्रह आहे. ज्यांनी आपल्या कलाकृतीतून सिख समुदायाच्या मुल्यांचे आणि शिकवणीची सुंदर मांडणी केली आहे. अभ्यागतांना सिख समाजाचे शौर्य, बलिदान आणि भक्तींच्या मुल्यांचे दर्शन घडविणाऱ्या चित्रांच्या विविधतेचा अनुभव यात घेता येईल.
संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा रामसिंघजी यांच्यासह माजी आ.सौ.अमिता अशोक चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागिरदार यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होईल. मुंबई, पुणे व इतर शहरातील प्रसिध्द कलाकार आपल्या कलांचे प्रात्यक्षिक सादर करतील. या प्रदर्शनातील विविध चित्रांमध्ये सिख समुदायाचा ईतिहास सांगितलेला आहे. अभ्यागतांना कलाकारांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळेल.
महाकला राष्ट्र गॅलरी नांदेड स्कवयर पीव्हीआर सिनेमा कौठा येथे ही चित्रप्रदर्शने 15 ते 20 ऑगस्ट 2024 दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 वाजता सर्व कलाप्रेमींसाठी मोफत राहिल. या चित्र प्रदर्शनाचे मुख्य मार्गदर्शक प्रसिध्द चित्रकार प्रा.नसेर बदर हे आहेत. या चित्रप्रदर्शनीच्या मिडीया संपर्कासाठी विजय रणविर(मो.9822758484) आणि बालाजी गायकवाड (मो.8668671716) यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.