नांदेडः अनिकेतनगर येथील लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुलचे शिक्षक लालू यंगुलवार यांचा नांदेड रेल्वेस्थानकावर रेल्वेखाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. उमरी येथील रहिवासी लालू यंगुलवार हे अनिकेत नगरातील लिट्ल स्कॉलर्स पब्लिक स्कुल या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते दररोज उमरी ते नांदेड अप डाऊन करत असत. दरम्यान २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ते कर्तव्य बजावून गावाकडे जाण्यासाठी नांदेड रेल्वेस्थानकावर आले असता सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नांदेड ते निजामाबाद रेल्वे स्थानकातून सुटण्याच्या तयारीत असताना ते चढण्याच्या प्रयत्नात होते. परंतू पाय घसरून ते रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडल्यामुळेत्यांना गंभीर मार लागला. अत्यावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या निधनामुळे हळहळ व्यक्त होत असून ३ ऑगस्ट रोजी शाळा बंद ठेवण्यात आली होती. आज दि. 3 रोजी शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 890 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पॅरोल रजेवर येवून फरार झालेला कैदी स्थानिक गुन्हा शाखेने पकडला महानगरपालिकेने तयार केलेला अंधार वजिराबाद पोलीसांनी स्वखर्चाने दुर केला