नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणातील दोन जणांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी विशेष न्यायाधीश सौ.आर.एम.शिंदे यांनी 2 ऑगस्ट रोजी प्रस्तावित केली आहे.
13 जुलै रोजी जागेची रजिस्ट्री करून देण्यासाठी फिससह एकूण 1 लाख 99 ह जार ज्यामध्ये फिस व्यतिरिक्त रक्कम ही लाच होती. त्याप्रकरणी हदगाव येथील दुय्यम निबंधक बालाजी शंकर उत्तरवार यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यावेळी त्यांनी ती लाचेची रक्कम शेख अबुबकर उर्फ बाबूभाई करीम सिद्दीकी यांच्याकडे दिली होती. त्यानंतर ती लाचेची रक्कम समीउल्ला उर्फ समीखान अजमत उल्ला यांनी हातळली होती. ते दोघे फरार झाले होते.
त्यानंतर त्यांना अटक झाली आणि न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, पोलीस अंमलदार मारोती मेकाले, राजेश राठोड आणि सचिन गायकवाड यांनी या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यास सांगितले. न्यायालयीन कोठडी मंजुर झाल्यानंतर खान आणि शेखच वकील ऍड.मनि रामेश्र्वर शर्ा (खांडील) यांनी जामीन अर्ज सादर केला. या अर्जावर आपले म्हणणे सादर करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने पुढील सुनावणी 2 ऑगस्ट रोजी सुनिश्चत केली आहे. त्यामुळे शेख आणि खान यांना तुरूंगात जावे लागले.