नांदेड(प्रतिनिधी)-पाच दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर 86 हजारांची लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी पोलीसांच्या विनंतीप्रमाणे न्यायालयीन कोठडीत घेतले आहे. त्यामुळे आजची रात्र दुय्यम निबंधकाला तुरूंगात काढावी लागेल.
हदगाव येथे एका जमीनीची रजिस्ट्री करण्यासाठी तक्रारदाराकडून 1 लाख 99 हजार रुपये लाच मागण्यात आली पण त्या लाचेमध्ये 1 लाख 20 हजार रुपये हे नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या फिसचे होते. म्हणजे 86 हजार लाच होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना 13 जुलै रोजी अटक केली. न्यायाधीश मराठे यांनी 15 जुलैपर्यंत, दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले. पोलीस कोठडी संपल्यानंतर वाढीव पोलीस कोठडीच मागणी झाली. त्यात न्यायालयाने 15 जुलै ते 18 जुलै अशी तीन दिवस पोलीस कोठडी वाढून दिली.
पोलीसांनी सादर केलेल्या माहितीप्रमाणे उत्तरवारच्या शिक्षीका पत्नी यांचे संयुक्त बॅंक अकाऊंट तपासणी करण्यात आले आहे. पोलीस कोठडी मागतांना पोलीसांनी या बॅंक खात्यात 40 लाख रुपये असल्याचा मुद्दा मांडला होता. आज आमचा तपास पुर्ण झाला आहे असे नमुद करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या लीस िरिक्षक प्रती जाधव यांनी उत्तरवारला न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायाधीश मराठे यांनी दुय्यम निबंधक बालाजी शंकर उत्तरवार (56) वर्ष यास न्यायालयीन कोठडीत घेतले. अर्थात तुरूंगात पाठविले. आज बालाजी उत्तरवारच्यावतीने जामीन अर्ज दाखल झाला काय?. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यावर आपले म्हणणे सादर केले काय? याबद्दल काही माहिती प्राप्त झाली नाही. या प्रकरणात दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवारच्यावतीने प्रसिध्दी विधिज्ञ ऍड.अमित डोईफोडे हे सादरीकरण करत आहेत.