*जिल्ह्याच्या क्रीडा विभागाकडून सन 2024-25 चे यशस्वी आयोजन*
नांदेड :- सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्याने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षीही या स्पर्धेमध्ये या तालुक्यातील शिवाजी हायस्कूलने आपली आगेकूच कायम ठेवली आहे.
सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली,आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड मार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा अंतर्गत सबज्युनियर 15 वर्षे मुले व ज्युनियर 17 वर्षे मुले-मुलींचे स्पर्धाचे आयोजन दि. 11 व 12 जुलै,2024 या कालावधीत ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड येथील मैदानावर करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन शिनेजो जोसे, प्राचार्य, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड व जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांचे शुहस्त रण्यात आले. याप्रसंगी राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा क्रीडा प्रमुख श्री.चंद्रप्रकाश होनवडजकर, श्री.सतपालसिंघ चौधरी (तालुका क्रीडा संयोजक) आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विजयी झालेला संघ लातूर विभागस्तरीय स्पर्धेकरीता नांदेड जिल्हयाचा प्रतिनिधीत्व करणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतील वेगवेगळ्या वयोगटात एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत रोमांचकारी खेळ दाखवून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, एकलव्य क्रीडा अकादमीतील 15 व 17 वर्षा खालील मुलांचा संघ प्रथम येऊन एकलव्य क्रीडा अकादमी,सगरोळी ता.बिलोललीचा जिल्ह्यात दबदबा कायम ठेवत उपस्थित क्रीडा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मने जिंकली. अंतिम निकाल असा आहे.
15 वर्षे मुले- प्रथम – श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, शारदानगर सगरोळी, द्वितीय- किडस किंग्डम पब्लिक स्कुल, नांदेड, तृतिय- शाकूतंल इंग्लिश मेडीयम स्कुल, नांदेड
17 वर्षे मुले- प्रथम- श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, शारदानगर सगरोळी, द्वितीय- हॉराईझन डिसकव्हरी अकॅडमी, नांदेड, तृतिय- किडस किंग्डम पब्लिक स्कुल, नांदेड
17 वर्षे मुली- प्रथम- ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, निळा रोड, नांदेड, द्वितीय- शाकूतंल इंग्लिश मेडीयम स्कुल, नांदेड
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्जयकुमार टेंभरे व प्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) सर यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.