नांदेड(प्रतिनिधी)-धान्य खरेदीमध्ये येवती येथील एका व्यक्तीने घोळ केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी फसवणुक या सदरात गुन्हा दाखल केला आहे. राम दिगंबर पाटील उर्फ गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार येवती येथील दिलीप बापूराव येवतीकर यांच्यासोबत धान्य खरेदीचे करार करण्यात आले होते. त्यात तुर आणि चना या धान्यांचा समावेश होता. दिलीप येवतीकरने 1 लाख 44 हजार रुपयांचे धान्य खरेदी करून त्याचे पैसे दिले नाहीत.न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नायगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 133/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरिक्षक वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,030 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हिमायतनगरमध्ये 73 हजारांची चोरी धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही