नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका चार चाकी वाहनात अत्यंत कु्ररपणे कोंबून ठेवलेली तीन गोवंश जनावरांची सुटका केली असून एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी शामराव वड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे सहकारी रात्रीची गस्त करत असतांना गिरगाव-मालेगाव रस्त्यावर त्यांनी एम.एच.38 एक्स 0672 क्रमांकाचा टेम्पो अडवला. त्यामध्ये तीन गोवंश जातीचे बैल किंमत 1 लाख 30 हजार रुपयांचे अत्यंत चुकीच्या पध्दतीने डांबून ठेवले होते आणि त्यांची कत्तल करण्यासाठी नेले जात होते. वाहन चालकांकडे कोणत्याही प्रकारच्या परवान्या नव्हत्या. अर्धापूर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 293/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार चव्हाण हे करणार आहेत. पोलीसांनी जनावरांची वाहतुक होणारा टेम्पो जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी जवळा बाजार ता.हिंगोली येथील शेख जिलानी शेख करीम विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.