बुरुड गल्ली परिसरातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल लोहा (प्रतिनिधी) – शहरातील बुर्डगल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी शादूल साहेबशाहा सय्यद (वय ४०, रा. बुर्डगल्ली, लोहा) यांच्या घराच्या कुलपाचे कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०२(२), ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांचाळ करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 89 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध रेती वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा दणका; दोन हायवांसह ८०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त