इजा करण्याची भीती दाखवून तरुणाला गंडा; कंधार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल कंधार (प्रतिनिधी) – ऑनलाइन माध्यमातून धमकी देऊन तसेच जीवे अथवा शारीरिक इजा करण्याची भीती निर्माण करून एका तरुणाची तब्बल 13 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कंधार तालुक्यातील गऊळ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गऊळ (ता. कंधार) येथील आकाश विठ्ठलराव तेलंग (वय 34) यांना 6 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात आरोपीने ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली. तसेच इजा करण्याची भीती निर्माण करून त्यांच्याकडून 13 लाख 95 हजार रुपये उकळून फसवणूक केली. या घटनेनंतर आकाश तेलंग यांनी कंधार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 424/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 318(4) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 106 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोवर्धनघाट येथे घरफोडी; २० हजारांचा ऐवज लंपास