नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी धनेगाव परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या छाप्यात १४ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, रोख रक्कम, १३ मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना धनेगाव परिसरातील उदय शिंदे यांच्या मळ्याच्या बाजूला मोकळ्या जागेत काहीजण पैशांवर तिरट नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी १४ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १) शिवानंद रामचंद्र कदम (वय ४२, रा. तुप्पा), २) रविकांत माधवराव लहाणे (वय ३२, रा. हरसद, ता. लोहा), ३) कृष्णाराव रावसाहेब शिंदे (वय २७, रा. धनेगाव), ४) राहुल राजू निथाळे (वय २५, रा. सावंगा खुर्द, जि. यवतमाळ), ५) मारोती आनंदा गजभारे (वय २७, रा. बळीरामपूर), ६) प्रेमानंद बाबुराव गजभारे (वय ३०, रा. बळीरामपूर), ७) सोम मदनराव शिंदे (वय ३२, रा. धनेगाव), ८) राम पांडुरंग मोरे (वय ३२, रा. धनेगाव), ९) शिवम उत्तमराव कवाळे (वय ३२, रा. धनेगाव), १०) माधव संतोष गायकवाड (वय २५, रा. धनेगाव), ११) संभाजी संजय शिंदे (वय २८, रा. धनेगाव), १२) केरबा रामराव शिंदे (वय ३७, रा. धनेगाव), १३) अभिजीत भगवान ढगे (वय २५, रा. बळीरामपूर) आणि १४) साईराज चिलवतवार (वय २६, रा. गोपाळचावडी). या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार ७०० रुपये रोख, विविध कंपन्यांचे १३ मोबाईल फोन आणि एमएच-२६-एफ-३४८२, एमएच-२६-बीडब्ल्यू-७११८ तसेच एमएच-२६-डीबी-७५८९ क्रमांकाच्या तीन मोटारसायकलींसह जुगाराचे साहित्य असा एकूण ९ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२७/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच पोलीस अंमलदार सोनाजी कानगुले, मिझा खलील बेग, असीफ अजगरअली शेख, धनपाल कांबळे आणि शंकर माळगे यांनी केली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नांदेड जिल्हा पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 9 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मांडवी पोलिसांची धडक कारवाई: ९ गोवंशाची क्रूर वाहतूक रोखली, ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त