नांदेड (विशेष प्रतिनिधी) -मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिटवी ते मांडवी रस्त्यावर गोवंश जनावरांची बेकायदेशीर व अत्यंत क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून वाहनासह एकूण ३,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील: नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत, टिटवी ते मांडवी जाणाऱ्या रस्त्यावरून एका पिकअप वाहनातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मांडवी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून संशयित अशोक लेलँड पिकअप वाहन क्रमांक MH-29 BE-6994 अडवले आणि पंचांसमक्ष तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनात ९ गोवंश जनावरांना निर्दयतेने दोरीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: ९ गोवंश बैल जनावरे: किंमत अंदाजे २,५०,००० रुपये अशोक लेलँड पिकअप वाहन MH-29 BE-6994: किंमत अंदाजे ९०,००० रुपये एकूण जप्त मुद्देमाल: ३,४०,००० रुपये आरोपींवर गुन्हा दाखल: या प्रकरणी खालील दोन आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे: १. फुल बाबाराव जगताप – वय २९ वर्षे, रा. शिरोली, जि. यवतमाळ २. अनिस चांद कुरेशी – वय २९ वर्षे, रा. धानोरा, जि. आदिलाबादयांच्याविरुद्ध मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२२/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५ आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम ११(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाची कामगिरी: सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी पोलीस ठाण्याचे सपोनि गायकवाड, पोउपनि गायकवाड व पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांना पोलिसांचे आवाहन: गोवंशाची अवैध वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता किंवा कत्तलीसाठी संशयास्पद हालचाली दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आशिष सिताराम बोराटे, जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!